नंदुरबार- शेतकर्यांचा सात बारा कोरा आणि दिडपट हमीभाव नाही दिला, तर शेतकरी पुन्हा मोदींना चहा विकायला लावतील, अशी सडकून टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केली. ते हिंगणी जि. नंदूरबार येथील शेतकरी मेळाव्यात बोलत होते. धुळे जिल्हातील धर्मा पाटील यांच्या विखरण गावापासून सुरु झालेली शेतकरी सन्मान्न यात्रा आज नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यात पोहोचली.यावेळी हिंगणी येथे स्वाभिमानीच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
हे देखील वाचा
यावेळी खा. राजू शेट्टी म्हणाले, मोजी सरकार सत्तेत येऊन चार वर्षे झाली, शेतकर्यांसाठी नवीन काय केले. केवळ दिशाभूल करून सत्ता हस्तगत केली. जे विरोधात असताना शेतकर्यांच्या बाजूने गळे काढायचे तेच आता शेतकर्यांना लुटत आहेत. शेतकरी आत्महत्येवर मोदी सरकारचं मौन आहे.त्यांना याबद्दल काहीच देणेघेणे नाही. शेतकर्यांचे शोषण करणारी ही भांडवली व्यवस्थाच निर्माण झाली आहे. याचे पाळेमुळे उखडून टाकायचे असतील तर आपल्याला संघर्ष करावाच लागेल.