नवी दिल्ली: १७ व्या लोकसभेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवीत नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे. नरेंद्र मोदी सरकारचा ३० मे रोजी शपथविधी होणार आहे. या शपथविधी सोहळयाचे BIMSTEC देशांच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. BIMSTEC ही सात देशांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. भारतासह बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि भूतान हे देश या संघटनेचे सदस्य आहेत.