मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी बॉम्बस्फोट

0

काठमांडू: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुढील महिन्यात नेपाळमधील जलविद्युत प्रकल्पाचे उदघाटन करण्यात येणार आहे. तत्पूर्वी जलविद्युत प्रकल्प कार्यालयात बॉम्ब स्फोट झाल्याची घटना घडली असल्याचे स्थानिक वृत्तपत्रांतून सांगण्यात येत आहे. काठमांडूपासून 500 कि.मी. अंतरावरील खांडबारी -9 मध्ये 900 मेगावॅट अरुण तिसरा हायड्रोएलेक्ट्रिक पॉवर प्लांटच्या कम्पाऊंडच्या भिंतीचे यात नुकसान झाले आहे.

बॉम्बस्फोटामुळे दक्षिण बाजूला भिंत किंचित नुकसान झाले आहे, पोलीस निरीक्षक बेड प्रसाद गौतम यांनी सांगितले. एक महिन्याच्या आत हा दुसरा स्फोट आहे. या घटनेची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

हा प्रकल्प 2020 पर्यंत कार्यान्वित होणार आहे. येत्या 11 मे रोजी नेपाळच्या आगामी भेटीत मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. 25 नोव्हेंबर 2014 रोजी तत्कालीन पंतप्रधान सुशील कोइराला यांच्या उपस्थितीत भारताचे सरकारी मालकीचे सतलज जल विद्युत निगम (एसजेव्हीएन) यांच्याशी अरुण 3 साठी एक प्रकल्प विकास करार (पीडीए) हस्तांतरीत करण्यात आला आणि भारतीय पंतप्रधान मोदींना भेट दिली.