नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला लोकसभा निवडणुकीच्या कारणामुळे मनाई करण्यात आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर देखील युट्युबवरून हटविण्यात आला आहे. दरम्यान आता नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित वेब सीरीज ‘Modi-Journey of a Common Man’ वर देखील बंदी आणण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने इरोज नाऊला या वेबसिरीजचे सर्व भाग बंद करण्याचे आदेश दिले.
यापूर्वी विवेक ओबेरॉय स्टारर पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यात आले आहे. प्रदर्शन होण्याच्या केवळ एक दिवस आधी या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर आता वेब सिरीज देखील बंद करण्यात आली आहे.