मोदी-जिनपिंग यांच्यात चर्चा

0

वूहान (चीन)- पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांसाठी चीनच्या दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट होणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आज दोन महत्वाच्या बैठका होत आहेत. एक म्हणजे दक्षिण आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष इतिहासात पहिल्यांदाच एकमेकांना भेटत आहेत. तर दुसरी भेट म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत.

जगाचं लक्ष या दोन्ही भेटींकडे लागलं आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांची ऐतिहासिक भेट झाली. कोरियातील युद्धानंतर पहिल्यांदाच दोन्ही देशाचे नेते एकत्र आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांसाठी चीनच्या दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट होणार आहे.

या दौऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे मोदी चीनला औपचारिक दौऱ्यावर गेलेले नाहीत. मात्र मोदी आणि जिनपिंग यांच्यात दोन्ही देशांबाबत विविध मुद्द्यावर चर्चा होणार आहे. डोकलाम वादानंतर हे दोन्ही नेते एकत्र येणार आहेत. या बैठकीत उभय देशांमध्ये कोणताही करार होणार नाही. गेल्या वर्षी डोकलाम मुद्दावरुन दोन्ही देशात निर्माण झालेला वाद आणि व्यापार विषयक मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या भेटीसाठी चीनने मोदींसाठी ‘रेड कार्पेट’ अंथरलं आहे, तर भारतानेही चीनच्या संवेदनशीलतेची काळजी घेतली आहे.