जनतेच्या विश्वासाला तडा, मोदींवर कंपनी विक्रीची नामुष्की; राहुल गांधींचा हल्लाबोल

0

नवी दिल्ली: देशात आर्थिक आघाडीवर मोदी सरकार अपयशी ठरल्याचे आरोप सातत्याने कॉंग्रेससह विरोधी पक्षाकडून केला जातो आहे. त्यातच मागील आठवड्यात भारताचा जीडीपी २३ टक्क्याने खाली गेल्याने आरोपात अधिकच भर पडली. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी यावरून आता मोदी सरकारला लक्ष केले आहे.

देशात निर्माण झालेल्या आर्थिक गर्तेतून अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्र सरकारने निर्गुंतवणुकीच्या धोरणावर जोर दिला असून, तब्बल २६ कंपन्यांचे खासगीकरण करण्याची तयारी सुरु केली आहे. यातील २३ कंपन्यांच्या खाजगीकरणाला केंद्राने मंजूरी दिली आहे. त्यातच आता भारतातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह असलेली भारतीय जीवन विमा महामंडळ अर्थात एलआयसीतील सरकारची २५ टक्के भागीदारी विकणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला आहे. ‘मोदीकडून सरकारी कंपनी विक्रीची मोहीम सुरु आहे. स्वत:च्या कामगिरीमुळे देशाची आर्थिक हाल झाले त्याच्या भरपाईसाठी देशाच्या संपत्तीची हळूहळू विक्री केली जात आहे. एलआयसीची विक्री करण्याची नामुष्की आता मोदींवर आली असल्याचे आरोप राहुल गांधींनी केले आहे. ट्वीटकरून राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

एअर इंडियासह बँकिंग क्षेत्रातील काही बँकांचं खासगीकरण केलं जाणार असतानाच आता आणखी २६ सार्वजनिक कंपन्यांमधील भागीदारी सरकार विकणार आहे. यात एलआयसीतील काही हिस्सा विकणार असल्याचे वृत्त समोर आले.