नवी दिल्ली:काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका प्रचारसभेत पाकिस्तानला उद्देशून बोलतांना ‘आम्ही तुमच्या अणुबॉम्बच्या धमक्यांना भीक घालत नाही. आमच्याकडेही अणुबॉम्ब आहेत आणि ते काही आम्ही दिवाळीसाठी ठेवलेले नाहीत, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. दरम्यान निवडणूक आयोगाने या वक्तव्याची तपासणी करून मोदींना क्लीनचीट दिली आहे.
मोदींच्या वक्तव्यावरून कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचे उल्लंघन झालेले नाही असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.