नवी दिल्ली-भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज मोहम्मद शमीचे आणि त्यांची पत्नी हसीन जहाँ यांच्यातील संबंध बिघडले आहे. दरम्यान मोहमद शमीला न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. त्याच्या पत्नीने पोटगीची रक्कम म्हणून महिना ७ लाख रूपये मिळावेत असा अर्ज केला होता. मात्र हा अर्ज फेटाळण्यात आला आहे.
अलीपूर कोर्टाने हसीन जहाँचा पोटगीची याचिका फेटाळत शमीच्या बाजूने निर्णय दिला. शमीला आता त्याच्या मुलीसाठी ८० हजारांचा भत्ता द्यावा लागणार आहे. मोहम्मद शमी मुलीचा खर्च उचलण्यासाठी आधीपासूनच तयार होता असे त्याच्या वकिलांनी सांगितले आहे.
दरम्यान अलीपूर कोर्टाने दिलेला निर्णय मान्य नसल्याने हसीन जहाँच्या वकिलांनी हायकोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मोहम्मद शमीपासून विभक्त झाल्यापासून हसीन जहाँने पुन्हा एकदा मॉडेलिंगच्या विश्वात पाऊल ठेवले आहे. मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ या दोघांमधले भांडण चांगलेच चव्हाट्यावर आले होते. हसीन जहाँने मोहम्मद शमीचे व्हॉट्स अॅप मेसेज, फेसबुक मेसेंजरवरचे मेसेज यांचे स्क्रीन शॉट पोस्ट करत त्याचे दुसऱ्या महिलांशी संबंध असल्याचा आरोप केला. तसेच पत्रकार परिषद घेऊन विविध आरोप केले. मोहम्मद शमीच्या कुटुंबीयांनी मला ठार मारण्याचा प्रयत्न केला असाही आरोप हसीन जहाँने केला होता.