मोहम्मद अली जीना हे महापुरुष : भाजपा खासदार

0

लखनौ-मोहम्मद अली जीना यांच्या फोटोवरुन अलीगढ मुस्लिम विद्यापीठात वाद पेटला असतानाच भाजपा खासदार सावित्रीबाई फुले यांनी भाजपला घरचा आहेर दिला. जीना हे महापुरुषच होते, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांचे मोलाचे योगदान होते, असे त्यांनी म्हटले आहे. जीना वादावार भाजपा खासदार सावित्रीबाई फुले यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, जीना हे महापुरुष होते आणि यापुढेही असतील. अशा महापुरुषाचे छायाचित्र आवश्यक असेल तिथे लावलेच पाहिजे.

महत्वाच्या मुद्द्यावरून लक्ष विचलित

गरीबी आणि भूकबळीसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरुन लक्ष अन्यत्र वळवण्यासाठीच हा वाद निर्माण केला गेला, असा दावाही त्यांनी केला आहे. खासदार सावित्रीबाई फुले यांनी यापूर्वीही पक्षाविरोधात भूमिका घेतली आहे. मी खासदार राहू अथवा न राहू, घटनेत बदल करू देणार नाही. केंद्राचे धोरण अनुसूचित जाती,जमातीच्या विरोधात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

भाजपवर दुसऱ्यांदा हल्ला

भाजपनेते दलितांच्या घरी जाऊन जेवण करून फक्त फोटो काढतात व प्रसिद्धी मिळवितात असे व्यक्तव्य त्यांनी यापूर्वी करून भाजपला अडचणीत आणले होते. दलितांच्या घरी जाऊन ते दलितांच्या घरचे जेवण खात नाही. बाहेरून मागविलेले जेवण खातात तसेच त्यांना जेवण वाढणारे देखील दलित नसतात ते दुसरेच असतात असा धक्कादायक व्यक्तव्य त्यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी जीना यांना महापुरुष संबोधले आहे.