नवी दिल्ली: कॉंग्रेसने मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित केले आहे. सोमवारी १७ रोजी कमलनाथ भोपाळच्या लाल परेड मैदानावर शपथ घेणार आहे. आज कमलनाथ सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. राज्यपाल यांची भेट त्यांनी घेतली आहे.
कमलनाथ यांच्यासोबत डझनभर मंत्री शपथ घेणार आहे.
सज्जन सिंह वर्मा, तुलसी सिलवाट, के पी सिंह, बाळा बच्चन, पटवारी, आरिफ अक्ले, विजय लक्ष्मी साधो, गोविंद राजपूत, लक्ष्मण सिंह, तरुण भानोत, सचिन यादव, कमलेश्वर पटेल, हिना काव्रे, एनपी प्रजापती, दीपक सक्सेना, संजय शर्मा यांना मंत्रीपद मिळणार असल्याचे निश्चित आहे. मध्य प्रदेशमध्ये कॉंग्रेसने सर्वाधिक ११४ जागा जिंकल्या आहे.
मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यात मुख्यमंत्री पदावरून स्पर्धा सुरु होती. अखेर पक्ष श्रेष्ठीने कमलनाथ यांना संधी दिली.