अमळनेर: शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी बैठक ठेवण्यात आली आहे. हि बैठक शहरातील मंगळग्रह मंदिरावर आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचे अनिल भाईदास पाटील यांना विधानसभा निवडणुकीसाठी पाठबळ मिळावे म्हणून कार्यकर्त्यांकडून पैशांचा स्वरूपात मदतीचा ओघ सुरु झाला आहे.
या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते अनिल भाईदास पाटील यांचेसह प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित असतांना सामान्य कार्यकर्त्यांनी अनिल भाईदास पाटलांनी विधानसभेची तयारी करावी म्हणून या निवडणुकीत आपला खारीचा वाटा असावा म्हणून पैशांसोबत मदतीचा ओघ सुरु झाला आहे.