वरणगांवच्या केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांवर माकडाचा हल्ला
( विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी )
प्रतिनिधी । वरणगांव
वरणगांव आयुध निर्माणीतील केंद्रीय विद्यालयात माकडाने हैदोस घातल्याने १४ विद्यार्थी जख्मी झाल्याची घटना घडली . यामुळे शालेय प्रशासनात खळबळ उडाली असून या घटनेमुळे केंद्रीय विद्यालय व तेथील रुग्णालयालयाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे .
याबाबत वरणगांव आयुध निर्माणीतील केंद्रीय महाविद्यालयात इयत्ता ५ वी ते १० पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यानुसार दि. ४ सप्टेबंर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास या विद्यालयातील शाळेच्या खोल्यांमध्ये अचानक माकडे घुसली व त्यांनी हैदोस घालून विद्यार्थ्यांना चावा घेण्यास सुरुवात केली . यामध्ये १४ विद्यार्थी किरकोळ जख्मी झाल्याने त्यांना फॅक्टरीचे महेश शिंदे , धनेश्वर चौधरी, बीएमएसचे योगेश मोरे, संतोष बाऱ्हे, इंटकचे एम . एस पाटील व शालेय प्रशासनाच्या शिक्षीका तृप्ती वानखेडे व इतर शिक्षकांनी वरणगांव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले . यावेळी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात एकच धावपळ उडाली होती .
*माकडाच्या हल्ल्यात जख्मी विद्यार्थी*
केंद्रीय विद्यालयातील वर्गात अचानक घुसलेल्या माकडामुळे वय वर्ष ८ ते १५ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांची भितीपोटी ताराबंळ उडाली . यामध्ये माकड बिथरले गेल्यामुळे त्याने रुषीका सोनवणे, वैष्णवी सोनवणे, अनुष्का सोनवणे, स्वरा माळी, गौरी बोरले, जान्हवी मराठे, अक्षरा घोडके, नक्षत्रा मोरे, गार्गी गवळी, करुणा जैन, दिव्या पाटील, कांचन पाटील, साहील सुरवाडे व कृश भोळे हे विद्यार्थी किरकोळ जख्मी झाले असून त्यांचेवर वरणगांव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर शाळेत विद्यार्थ्यांच्या या धावपळीच्या गोंधळात कु. करुणा जैन या विद्यार्थीनीचा हात फॅक्चर झाल्याने तिला भुसावळातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .
*केंद्रीय विद्यालयाचा हलगर्जी पणा*
केंद्रीय विद्यालय हे आयुध निर्माणीचे महाप्रबंधक यांच्या निवासस्थाना लगतच असून या भागात गेल्या काही दिवसांपासून माकडांनी हैदोस घातला आहे . मात्र, याबाबत केंद्रीय शालेय प्रशासनाच्या विद्यालयाच्या प्रमुखांनी आयुध निर्माणीच्या संबधीत विभागाला कुठल्याही प्रकारची सुचना दिल्याचे दिसून येत नसल्याचे समोर येत आहे .
*कामगार व विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण*
आयुध निर्माणीच्या कारखाना परिसरात कामगारांना बिबट्याचे दर्शन होत असल्याने त्यांच्यामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून कामगारांच्या संघटनानी नुकतेच प्रशासन व आमदार, खासदारांना निवेदन देवून हिंस्त्र प्राण्यांचा ( बिबटे ) बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. तर त्यातच विद्यालयात घुसलेले माकड हा विद्यार्थ्यांच्या दहशतीचा विषय ठरला आहे .
*वन विभागाकडे पुन्हा पत्र व्यवहार*
आयुध निर्माणीतील हिंस्त्र प्रांण्याचा (बिबट्याचा ) बंदोबस्त करण्यात यावा त्याच प्रमाणे माकडाचाही बंदोबस्त करण्याची मागणी आयुध निर्माणीचे सहायक महाप्रबंधक महेश शिंदे यांनी वनविभागाचे रुपाली शिंदे व इतर अधिकार्यांशी संपर्क साधून हिंस्त्र प्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी केली .
*आयुध निर्माणीचे रुग्णालय नावालाच*
केंद्रीय संरक्षण विभागाचे प्रमुख ठिकाण असलेल्या आयुध निर्माणीत केंद्र शासनाचेच सुसज्ज रुग्णालय आहे . मात्र, या रुग्णालयात औषधांची तसेच सुविधांची उपलब्धता नसल्याने कर्मचारी व त्यांच्या परिवाराला खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे .