श्रीलंका :– श्रीलंकेत गेल्या मे 20 पासून देशात सातत्याने पाऊस सुरू आहे. या मान्सूनच्या पावसाने बळी गेलेल्या लोकांची संख्या 21 पर्यंत वाढली आहे. याठिकाणी मदत आणि बचाव कार्यांसाठी सैन्य सज्ज केले गेले आहे. 25 जिल्ह्यांतील 20 जिल्हे प्रभावित झाले असून यात १९ जणांचा मृत्यू झाला आहे तर दोन बेपत्ता आहेत.
श्रीलंका आपत्ती व्यवस्थापन केंद्राने जारी केलेल्या एका निवेदनात असे म्हटले आहे की, खराब हवामान आणि मान्सून पावसामुळे 20 जिल्ह्यांमधील 150000 पेक्षा जास्त लोक अडकलेले आहे.
डीएमसीचे प्रवक्ते प्रदीप कोडिदी म्हणाले की, दक्षिणेतील दोन लोक बेपत्ता आहेत आणि 55,000 हून अधिक लोकांना बाहेरच्या भागात सोडण्यात आले आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी पाठविण्यात आले. आपत्ती निवारण मंत्री दुमांडा दीपानायक म्हणाले की, 100 हून अधिक घरांचे पूर्णपणे नुकसान झाले आहेत.