मान्सून केरळमध्ये दाखल

0

नवी दिल्ली :- मान्सून आज सकाळी केरळमध्ये दाखल झाला आहे. ७ ते १० जून दरम्यान पाऊस राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा देणार मान्सून गतवर्षीपेक्षा एक दिवस आधीच केरळमध्ये प्रवेश केला आहे. तसेच आपल्या वेळापत्रकापेक्षा तीन दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला आहे. तर पुढील २४ तासात कोकणातील सिंधूदुर्गमध्ये वादळी वारा व गडगडटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे ‘स्कायमेट’ने म्हटले आहे.

मान्सूनने सोमवारी जोरदार वाटचाल करीत केरळच्या सीमेपर्यंत धडक मारली होती. भारतीय हवामान विभागाने २९ मे रोजी मान्सूनचे केरळला आगमन होणार असल्याचा अंदाज जाहीर केला होता़. हा अंदाज यंदा बरोबर ठरला असून मंगळवारी मान्सून केरळमध्ये प्रवेश केला. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर 24 ते 48 तासात दक्षिण अरबी समुद्र, तामिळनाडू किनारपट्टी, मालदीव-लक्षद्वीप बेटे आदी मार्गाने मान्सून पुढे वाटचाल करतो. मुंबईत पुढील आठवड्यात मान्सून दाखल झालेला असेल. तर पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील असे सांगितले जात आहे.