वाराणसीमध्ये पूल कोसळून १२ जण ठार

0
वाराणसी :- वाराणसीमध्ये बांधकाम सुरु असलेला एक पूल कोसळून १२ जण ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पूल कोसळल्यामुळे ढिगाऱ्याखाली सुमारे 50 जण दबले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याठिकाणी मदत कार्य सुरु करण्यात आले आहे.

हि घटना वाराणसीतील केंट रेल्वे स्थानकाजवळील कमलापति त्रिपाठी इंटर कॉलेजसमोर घडली आहे. घटनास्थळी शासकीय व पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेतली असता ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. हा भाग अत्यंत गर्दीचा असल्याने या रस्त्याने जास्त वाहनांची व लोकांची ये-जा असते. ढिगाऱ्याखाली दबलेल्यांची संख्या पाहता मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. सुमारे दोन वर्षांपासून या पुलाचे काम सुरू होते.