वैद्यकीय महाविद्यालयातील प्रत्येक वर्षाचा ९५ टक्क्याहून निकाल

जळगाव प्रतिनिधी ।

हाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक विभागातर्फे नुकतेच वैद्यकीय मारास कामाचे निकाल जाहीर केले. वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रत्येक वर्षाचा ९५ टक्क्याहून अधिक निकाल लागला आहे. प्रथम वर्ष बोधलॉजी अदिबा मोहम्मद शरीफ ७०८ गुण मिळवित महाविद्यालयातून प्रथम आला तर राहूल ललीत जैन यास ६०८ गुण मिळवित द्वितीय, प्रांजल पंडीतराव फुसे ६७४ गुण मिळवित तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.

प्रथम वर्षाची २०६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यात १७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८६ टक्के निकाल लागला आहे. द्वितीय वर्षात प्रथम माधुरी भास्कर मस्के ७११ गुण, द्वितीय चिंतन विजय चौधरी ६८० गुण तर तृतीय अमित सुनील साखरे ६७८ गुण मिळविले आहे. एकुण १५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील १४४ उत्तीर्ण झाले असून ९५.३६ टक्के निकाल लागला आहे. तृतीय वर्ष गौरव संतोष वाबले ७०५ गुण, द्वितीय सायली निवृत्ती गाडगे ६८५ गुण तर तृतीय अरिबा शरीब अझमी ६७८ गुण मिळविले आहे. परीक्षेसाठी एकुण १३७ विद्यार्थी बसले होते. त्यातील १३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. निकालाची टक्केवारी ९५.६२ इतकी आहे. अंतिम वर्ष प्रियंका अमित पंड्या ६४३ गुण, समृज्ञी सुरेश पठारे ६३६ गुण आणि कायनात मोहम्मद कासीम शेख ६३५ अंतिम वर्षात १०५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील १०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ९५.२३ टक्के इतका निकाल लागला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील, डी. एम. कॉर्डिओलॉजीस्ट डॉ. वैभव पाटील, अधिष्टाता डॉ. एन एस आर्विकर, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड यांनी आनंद व्यक्त करत कौतुक केले आहे. अधिष्टाता डॉ. एन. एस. आर्विकर आणि प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व डॉक्टरांनी घेतलेल्या परिश्रमामुळे सतत ९५ टक्के निकाल लागला. उच्च निकालाची यशोगाथा कायम राखण्यात महाविद्यालयास यश येत आहे. संस्थाध्यक्ष या नात्याने सर्व गुरूजनांचा अभिमान वाटतो. तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी कौतुक केले आहे.