सर्वाधिक उष्ण राज्य राजस्थान

0

जयपूर – राजस्थान या वर्षीच्या उन्हाळ्यात देशातील सर्वात उष्ण राज्य ठरले आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे ४६.५ अंशसेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली असून, हे देशातील आत्तापर्यंतचे सर्वाधिक तापमान आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.

शुक्रवारच्या तुलनेत आज राजस्थानमध्ये सर्वत्रच १ ते २ अंशसेल्सिअस तापमान अधिक असल्याची नोंद करण्यात आली. श्रीगंगानगरनंतर चुरूमध्ये ४५.६, बिकानेर ४५.६, बारमेर ४४.८, पिलानी ४४, कोटा ४३.७, जोधपूर व अजमेर ४३.५, जयपूर ४३.४ आणि दबोकमध्ये ४२.६ अंशसेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील सर्वाधिक तापमान हे सामान्य तापमानाच्या तुलनेत ३ ते ४ अंशसेल्सिअसने अधिक होते. तर कमीत कमी तापमान २३.८ आणि २९.६ अंशसेल्सिअस एवढे होते. हवामान खात्याने पुढील २४ तासात काही ठिकाणी उष्णतेच्या लहरी येण्याची शक्यता वर्तवली आहे.