मोस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा खात्मा

0

जम्मू: मोस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा खात्मा आज सुरक्षा यंत्रणानी केला आहे. झाकीर मुसा हा अन्सार गजवत उल हिंद या संघटनेत सामील झाला होता. झाकीर मुसा हा अगोदर हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये सक्रीय होता. नंतर त्याने दुसर्या आतंकवादी संघटनेत सहभाग घेतला होता.

   पुलावाम येथे गुरुवारी दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्या नुसार या भागात शोध मोहीम घेण्यात आली. शोधमोहिमे दरम्यान झालेलेया चकमकीत त्याच  खात्मा झाला आहे. आज सकाळी त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आहे. दरम्यान अधिक सुरक्षेसाठी या भागातील शाळा व महाविद्यालयांना सुती जाहीर करण्यात आली आहे. गेल्या १८ दिवसात सुरक्षा  यंत्रणांनी १८ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. बुरहान वानी नंतर कश्मीर मध्ये तो दहशतवाद्याचा चेहरा म्हणून उदयास आला होता.