आई ”तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही” -सचिन तेंडूलकर

0

मुंबई :- आज भारतासह जगभरात, मातृदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे. सोशल मीडियावर प्रत्येक जण आपल्या आईसोबतचा फोटो शेअर करताना दिसत आहे. मग आजच्या या खास दिवशी आपले क्रीडापटू कसे मागे राहतील, सचिन तेंडुलकरपासून ते सायना नेहवालपर्यंत…सर्व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी आजच्या दिवशी आपल्या आईचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत सर्वांना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आईविषयी आपल्या भावना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केले. “तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही”, अशा शब्दांमध्ये सचिनने आपल्या आईला मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.