धरणगाव, प्रतिनिधी – तालुक्यात अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या धरणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी मोतीलाल भाऊलाल माळी यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. हि निवड सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिष्ठेची केली होती.
सोसायटीत उबाठा शिवसेना, कॉग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची सत्ता आहे. सोसायटीवर महायुतीचा झेंडा फडकविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न झाले. मात्र, ऐनवेळी आघाडीच्या नेत्यांनी अनेक डावपेच टाकून सोसायटीवरील आपले वर्चस्व कायम राखले. माजी नगराध्यक्ष, उद्योगपती सुरेश चौधरी, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, संस्थेचे माजी चेअरमन उमेश माळी व संचालक ज्ञानेश्वर माळी रामकृष्ण माळी, पुष्पाताई महाजन, भिकुबाई माळी यांनी नवनिर्वाचित चेअरमन मोतीलाल माळी यांचे हारगुच्छ देऊन सत्कार केला. निवडणुक अधिकारी एन.एस. शिंदे यांनी काम पहिले. सचिव महेंद्र पाटील, लिपिक रवींद्र बाविस्कर, प्रवीण माळी यांनी सहकार्य केले.