भोपाळ-मध्य प्रदेशच्या राज्यपाल आणि गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी एक विधान केले आहे. हरदा जिल्ह्यातील टिमरनी येथील आंगणवाडीच्या एका कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदी अविवाहीत आहेत, असे त्या म्हणाल्या. महिला आणि मुलांच्या समस्यांबाबत बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.
मोदींच्या जवळच्या व्यक्ती म्हणूनही आनंदीबेन पटेल यांची ओळख आहे. नरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात आल्यानंतर आनंदीबेन पटेल यांना गुजरातच्या मुख्यमंत्री बनल्या होत्या. विधानसभा निवडणुकांच्या काही महिन्यांपूर्वी त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन हटवण्यात आले होते. त्यानंतर मध्य प्रदेशच्या राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. लोकसभा निवडणुकीवेळी वाराणसीमध्ये नामांकन भरताना शपथपत्रात विवाहीत असून पत्नीचं नाव जशोदाबेन असल्याचे मोदींनी सांगितले आहे.