दि. १६/६/२३ रोजी आदरणीय, खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेब माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष यांना खान्देश बायो ऑरगॅनिक इनपुटस मॅन्यु. असोसिएशन तर्फे निवेदन देण्यात आले तसेच साहेबांना कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुसतक देऊन सत्कार करण्यात आला. निवेदन देते प्रसंगी आदरणीय, श्री एकनाथरावजी खडसे साहेब आमदार तथा माजी कृषिमंत्री, आदरणीय श्री. अरुणभाई गुजराथी माजी विधानसभा अध्यक्ष, आदरणीय श्री रविंद्र भैया पाटील जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव यांचे सह अन्य नेते उपस्थित होते निवेदनात दिलेल्या सर्व विषयांवर आदरणीय पवार साहेबांनी सविस्तरपणे चर्चा केली व जॉइंट कमिशनर कृषी भवन दिल्ली येथे आपण दिलेल्या निवेदन विषयी कळवू तसेच कृषी आयुक्त पुणे यांना सुध्दा निवेदनात दिलेल्या विषयी कळवू असे समाधानकारक आश्वासन आदरणीय, पवार साहेबांनी निवेदनकर्त्यांना दिल्या… निवेदन देतांना प्रदीप (बंडु) भोळे अध्यक्ष – खान्देश बायो ऑरगॅनिक इनपुटस मॅन्यु असोसिएशन, श्री.प्रशांत बाणाईत संचालक, श्री. छत्रपती वानखेडे संचालक , श्री. राजेश नारखेडे संचालक, श्री. शरद पाटील विभागीय अध्यक्ष, श्री. अभय सायनेकर व अन्य सदस्य उपस्थित होते.