चांदवड शहरातील श्री नेमिनाथ जैन संस्थेत दि 31 मे 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता दिंडोरी लोकसभा खासदार चषक ,बक्षीस वितरण सोहळा मराठी सिने अभिनेते श्री मकरंद अनासपुरे ,केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ना भारतीताई पवार ,आमदार डॉ राहुल दादा आहेर ,श्री केदा नाना आहेर जिल्हा अध्यक्ष भाजप ,श्री भूषण भैय्या कासलीवाल प्रथम नगराध्यक्ष चांदवड तसेच सर्व दिंडोरी लोकसभा मतदारसंघ तालुका पदाधिकारी दिंडोरी लोकसभा मतदार संघ ,सर्व ज्येष्ठ नेते ,जिल्हा पदाधिकारी,सर्व पदाधिकारी ,सर्वश्रेष्ठ कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सर्व जिल्ह्यातील खेळाडू पारितोषिक विजेत्या टीम यांना भव्य बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला.
जिल्हा स्तरीय स्पर्धा सकाळी 7.30 वाजेपासून श्री नेमिनाथ जैन कॉलेज ग्राउंड,चांदवड क्रिकेट – क्रीडा संकुल मैदान चांदवड ,कालिका माता रोड चांदवड येथे क्रीडा संपन्न झाल्या.यावेळी संस्था पदाधिकारी श्री बेबीलाल संचेती,अजित सुराणा ,जवाहर आबाड यांचेसह भाजप पदाधिकारी मोहन शर्मा,अशोककाका व्यवहारे,तालुकाध्यक्ष मनोज शिंदे,शहराध्यक्ष प्रशांत अप्पा ठाकरे,आदिवासी सेलचे संजय पाडवी, विशाल ललवाणी,व्यापारी आघाडीचे महेश खंदारे,शांताराम भवर,मनोज बांगरे,गोरख ढगे आदी उपस्थित होते.