सिंचन प्रकल्पांचा खा. उन्मेष पाटील यांनी घेतला आढावा

0

तापी महामंडळात तीन तास चालली बैठक

चाळीसगाव – जळगाव लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार उन्मेष पाटील यांनी आज दुपारी १२ वाजता तापी महामंडळाच्या सर विश्वसरैय्या सभागृहात तापी महामंडळाच्या अंतर्गत कामांबाबत आढावा बैठक घेतली. यात लोंढे वरखेडे ते पाडळसरे , शेळगाव बेरेज ते भागापुर प्रकल्प, यांच्यासह दीड लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार्‍या सर्वच सिंचन प्रकल्पांची माहिती घेतली व सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी तापी पाटबंधारे महामंडळाचे अधीक्षक अभियंता ए एस मोरे, कार्यकारी अभियंता जी एस महाजन, सेवानिवृत्त प्रादेशिक अभियंता व्ही. डी. पाटील इंजी. प्रकाश पाटील यांचे सह अधिकारी कर्मचारी कार्यकर्ते उपस्थित होते.
जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उमेश पाटील यांनी आज जिल्ह्याच्या सिंचन प्रश्नांबाबत सुरुवात करीत तापी पाटबंधारे महामंडळाच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी लोंढे वरखेडे प्रकल्प ते पाडळसे धरण शेळगाव बॅरेज जळगाव एम आय डी सी पाणीप्रश्न भागापूर प्रकल्पाच्या माध्यमातून सिंचन क्रांती तसेच सात बलुन बंधारे, पद्मालय सिंचन प्रकल्पांसह जिल्ह्यातील दीड लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणारे सर्व प्रकल्पाबाबत आढावा घेतला. तीन तास चाललेल्या बैठकीत प्रकल्पाबाबतच्या उणीवा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली ४ तारखेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे निवेदनातून मांडण्यात येणार आहे. याकरिता खासदार उन्मेष पाटील यांनी सर्व प्रकल्प बाबतच्या बारकावे समजून घेतले. यावेळी प्रादेशिक अभियंता व्ही. डी. पाटील यांनी अनेक प्रकल्पाबाबत त्यामध्ये असणार्‍या पाणीसाठे याबाबत खासदारांना माहिती दिली. याप्रसंगी कार्यकारी अभियंता धनंजय पाटील, वाघुर धरणाचे कार्यकारी अभियंता श्री बोराडे, इंजिनीयर प्रकाश पाटील, वाघुरचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.