महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे कर्तुत्ववान कामगार पुरस्काराने श्री विलास पाटील सन्मानित

भुसावळ प्रतिनिधी l 

येथील रहिवासी व सध्या महावितरण कंपनीत सावदा विभागांतर्गत 33/11 के.व्ही. भालोद सबस्टेशन ( उपकेंद्र) येथे कार्यरत असलेले वरीष्ठ यंत्रचालक श्री विलास रघुनाथ पाटील यांना महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या औचित्याने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ जळगाव व महावितरण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कर्तुत्ववान कामगार पुरस्कार 2023’ ने सन्मानित करण्यात आले. महावितरण जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे व कामगार कल्याण अधिकारी कुंदन खेडकर यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी जळगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र मार्के,उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर , कामगार कल्याण मंडळ पिंप्राळा केंद्र संचालक नरेश पाटील, आयुर्वेदिक आहार तज्ञ डॉ. निशा पाटील, उपकार्यकारी अभियंता पराग चौधरी व महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते. त्यांना हा पुरस्कार उल्लेखनीय कार्य तसेच कामगार कल्याण मंडळाच्या योजना व उपक्रम निस्वार्थ भावाने प्रचार व प्रसार करून कामगारांना अर्थसहाय्य मिळवून दिल्याबद्दल प्रदान करण्यात आला.एकूण पाच आस्थापनेतील कर्मचाऱ्यांना ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.