अमळनेर-शहरातील अनेक अट्टल घरफोड्या पिस्तूलाचा धाक दाखवून धुमाकूळ घालणारा आणि दीपक पाटील खून प्रकरणी २ महीन्यापासून फरार असलेल्या आरोपी राज वसंत चव्हाण रा. प्रताप हॉस्पिटल जवळ मारवड रोड याला अमळनेर पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर व त्यांच्या पथकाने वाशिम जिल्ह्यातून रात्री जेरबंद केले आहे. या आरोपीला करून अमळनेर येथे आणले जात आहे.
या आरोपीला पकडण्यासाठी चाळीसगांव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी बुधवारी सूचना केल्या होत्या. या आरोपीचा अमळनेर शहरातील हॉटेल रुपालीचे मालक यांच्यावर प्राणघातक हल्ला, पालिकेच्या समोर पानटपरी चालकाची लूट व रेल्वे स्थानकावर धुमाकूळ घालणे शेगांव येथील एटीएम जवळील खून प्रकरण तसेच अरुण पुंडलिक पाटील यांच्या घरातून केलेली लूट अश्या विविध गुन्ह्यात सभाग आहे.
आरोपी राज यास तत्कालीन पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांनी पिस्तूलासह जेरबंद केले होते. त्यानंतर जामिनावर सुटलेल्या राज चव्हाण याने पुन्हा अमळनेर शहरात धुमाकूळ घातला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे, चाळीसगांव विभागाचे अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांनी आरोपीस पकडण्यास मदत करणाऱ्याला १५ हजार रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते.