मुक्ताईनगर प्रतिनिधी l
श्री संत मुक्ताई संस्थान कोथळी -मुक्ताईनगर समाधीस्थळ मुळ मंदिर श्री क्षेत्र मुक्ताईनगर जि. जळगाव येथून आषाढी वारीसाठी हजारो वारकऱ्यांचे मेळ्यासह मुक्ताई पालखी सोहळाने आज प्रस्थान ठेवले . जुने कोथळी मंदीराच्या सभामंडपातील छोटेखानी कार्यक्रमात आ.चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून महा आरती करून पालखी खांद्यावर घेवून तसेच गळ्यात टाळ घेवून मुक्ताई चरणी सेवा दिली. तसेच तत्पूर्वी खासदार रक्षा खडसे , बुऱ्हानपूर चे आमदार शेरा भैय्या , माजी आमदार अरुण दादा पाटील , जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा ॲड रोहिणी खडसे यांनी भेटी देवून मुक्ताई दर्शन घेतले होते. दरम्यान, मुलींचे बाल संस्कार शिबीर आणि पालखी सोहळा प्रस्थान निमित्त संत सखाराम महाराज यांचे वंशज हरिभक्त पारायण रामेश्वर महाराज तिजारे यांचे काल्याचे कीर्तन झाले.
यावेळी संस्थानचे ॲड रविंद्र पाटील , पालखी सोहळा नियोजनासाठी आलेले पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदीर चे ह भ प मेघराज महाराज वळखे , निवृत्ती पाटील , विलास धायडे, रविंद्र दांडगे, विशाल महाराज खोले, नितीन महाराज अहिर , विजय महाराज खवले, श्री संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रविंद्र महाराज हरणे , उद्धव महाराज जुनारे, संदीप पाटील, यु डी पाटील, कल्पना हरणे, गीता जुनारे, दुर्गा मराठे महाराज, कृष्णा महाराज, भावराव महाराज, अंबादास महाराज यांच्यासह असंख्य किर्तनकार , टाळकरी उपस्थित होते .
सपूर्ण महाराष्ट्रातुन प्रथम प्रस्थान ठेवणारी संत मुक्ताई समाधी स्थळारून भुवैकूंठ पंढरीला आषाढी वारीसाठी जाणाऱ्या मुक्ताई पालखी ने आज हजारो वारकरी भाविकांचे उपस्थितीत टाळ मृदुंगाच्या गजरात आणि “मुक्ताई -मुक्ताई ” नाम जयघोषात प्रस्थान केले .
तत्पूर्वी जूने मंदिरावर सकाळचे महाप्रसादाची व्यवस्था पांडुरंग पवार चापोरा व नवीन मंदिरावर दुपारचा महाप्रसाद महाजन परिवाराकडून देण्यात आला . तसेच प्रकाश पाटील, नाचनखेडा यांचे पालखी रथाचे मानाचे बैल विधीवत पुजन करून मिरवणुक ने कालच पोहचले होते . आज पहाटे मंगल काकडारती ने आई मुक्ताईस महापुजा श्री पुंडलीकराव दामोधरराव पवार चापोरकर यांचे हस्ते करण्यांत आली व संस्थान चे मानकरी व अध्यक्ष अॅड. रविंद्र भैय्यासाहेब पाटील व यांचे हस्ते पुजारी विनायक व्यवहारे यांनी पादूकाना पंचामृत अभिषेकाने सुरूवात करताच वारकरी दिंडीनी प्रस्थान भजन सुरू केले.
वारकरी भाविक “मुक्ताई -मुक्ताई ” जयघोषात देहभान हरपत तल्लीन झाले होते दुपारी रणरणत्या उन्हात ठिक ३ वा . आमदार चंद्रकांत पाटील व संस्थानचे अध्यक्ष ॲड रविंद्र पाटील यांचे हस्ते पादूका पालखीत स्थानापन्न करीत पालखीचे प्रस्थान झाले .
“देह जावो अथवा राहो !
पांडूरंगी दृढ भावो!!
चरण न सोडी सर्वथा !
आण तुझी पंढरीनाथा!!
वदनी तुझे मंगळ नाम !
ह्रदयी अखंडीत प्रेम!!
नामा म्हणे केशवराजा !
केला नेम चालवी माझा!!
…हा अभंग म्हणून मंदीराला प्रदक्षिणा करून पालखी रथात ठेवून प्रस्थान झाले .मुक्ताईनगर व कोथळी ग्रामस्थांनी जड अंतःकरणांने निरोप दिला .
मुक्ताबाई- मुक्ताबाई जयघोष करित प्रचंड भक्तीमय वातावरणात पालखी मंदिर परिक्रमा करित रथात ठेवून प्रस्थान पार पडले. गावोगावीचे दिंड्या हजारो वारकरी रणरणत्या उन्हातही मुक्ताबाई भजनात तल्लीन झाले होते. जुने मंदिरातून भुसावळ मार्गे प्रवर्तन चौकातून येताना ठिकठिकाणी स्वागत करीत नविन मुक्ताबाई मंदिररात विसावा घेतला.