युवक काँग्रेसचे मुक्ताईनगर ता.अध्यक्ष करणार पंचायत समिती समोर प्राणांतिक उपोषण

तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने उपोषणाचा मार्ग - नरेश पाटील ( खंडागळे )

प्रतिनिधी । मुक्ताईनगर

तालुक्यातील चिंचखेड खुर्द या ग्रामपंचातीच्या कारभाराबाबत वारंवार चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी लेखी मागणी वारंवार केली. मात्र, याबाबत दखल घेतली जात नसल्याने युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नरेश पाटील ( खंडागळे )यांनी त्यांच्या युवक काँग्रेसच्या तालुका पदाधिकाऱ्यांसोबत व कार्यकर्त्यांसोबत १४ ऑगष्ट पासुन उपोषणाचा इशारा दिला आहे.

 

तालखेडा येथील रहीवासी असलेले राष्ट्रीय युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नरेश शालीग्राम पाटील ( खंडागळे )यांनी येथील ग्रामपंचायतीच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराविरोधात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचेकडे वेळोवेळी तक्रार केली आहे. मात्र वारंवार तक्रारींची चौकशी करून संबंधीतांवर कारवाई केली जात नसल्याने नरेश खंडागळे ( पाटील ) यांनी दि . १४ ऑगष्ट पासुन पंचायत समिती कार्यालय मुक्ताईनगर येथे प्राणांतिक उपोषणास बसण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे . यामुळे पंचायत समिती प्रशासन याबाबत काय ? हालचाली करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.