जळगाव: मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे भाजपकडून उमेदवारी करत आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष चंद्रकांत पाटील यांनी आव्हान उभे केले होते.
(मुक्ताईनगर मधील अपडेट्ससाठी थोड्या-थोड्या वेळेत हीच लिंक रिफ्रेश करत रहा.)
रोहिणी खडसे यांना आता थोडीशी आघाडी मिळाली आहे. २०९० मतांनी रोहिणी खडसे यांनी आघाडी घेतली आहे. सुरुवातीला त्या पिछाडीवर होत्या.
सुरुवातील भाजपच्या रोहिणी खडसे पिछाडीवर होत्या. मात्र आता त्यांनी आघाडी घेतली आहे. ९५० मतांची रोहिणी खडसे यांनी आघाडी घेतली आहे.
मत मोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या फेरीत अपक्ष चंद्रकांत पाटील आघाडीवर आहे. पहिल्या फेरी चंद्रकांत पाटील यांना ८१७ मतांची आघाडी आहे.