नवी दिल्ली: लोकसभेच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. समाजवादी पक्षाला नवीन बळकटी आणण्यासाठी मुलायम सिंह यादव मैदानात उतरले असून, त्यांनी पक्षाची कमान आपल्या हातात घेतली आहे. सपा च्या काही जेष्ठ नेत्यांना भेटून लोकसभा निवडणुकीतील पराभवाची मीमांसा करत आहेत. जेष्ठ नेत्यांना भेटून पुन्हा एकदा पक्षबांधणीवर जोर देणार असल्याचे बोलले जात आहे.
समाजवादी पक्षाची पुढची रणनीती आखण्यासाठी मुलायम सिंह सक्रीय झाले आहेत. पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांची भूमिका नेमकी काय असणार हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. याबद्दल माहिती देण्यासाठी समाजवादी पक्षाकडून टाळाटाळ केली जात आहे.
समाजवादी पक्षाच्या सध्याच्या परिस्थिती बाबत मुलायम सिंह चिंतातूर झाले आहे असे काही सपा च्या जेष्ठ नेत्यांनी सांगितले. त्यामुळे जुन्या नेत्यांना भेटून पुन्हा एकदा पक्षबांधणीवर मुलायम सिंह जोर देणार असे चित्र दिसत आहे.