नवी दिल्ली-पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान होणारे माजी क्रिकेटर इम्रान खान यांच्याविषयी बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी इम्रान यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Well spoken Imran Khan. I have been saying whatever you said on all channels past two days regarding India-Pakistan! I hope you succeed in making your “Mulk” have good relations with my “Mulk” pic.twitter.com/YCe741vW22
— Rishi Kapoor (@chintskap) July 26, 2018
इम्रान खान यांनी भारत- पाकिस्तान संबंधाविषयी वक्तव्य करत भारतासोबत संबंध सुधारण्याचा माझा प्रयत्न असेलच तुम्ही एक पाऊल पुढे या आम्ही दोन पावले पुढे टाकू, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यालाच अधोरेखित करत ऋषी कपूर यांनी आपल्या ‘मुल्क’ या आगामी चित्रपटाचा दाखला देत एक ट्विट केले.
गेल्या दोन दिवसांपासून भारत- पाकिस्तान संबंधांविषयी जे मी माध्यमांसमोर बोलत होतो तेच तुम्हीही बोलले. मी आशा करतो की तुमच्या मुल्कचे माझ्या मुल्कसोबतचे नाते सुधारण्यात तुम्हाला यश मिळेल’, असे ट्विट ऋषी कपूर यांनी केले आहे.