मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ.विजय पाटील बिनविरोध !

0

मुंबई : डॉ. विजय पाटील यांची मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अध्यक्षपदी निवड झाली आहे. या पदासाठी पाटील यांचा एकमेव अर्ज आला असल्याने त्यांची या पदासाठी बिनविरोध निवड झाली. ते डी. वाय पाटील क्रीडा अकादमीचे अध्यक्ष आहेत. सोबतच संजय नाईक आणि अमोल काळे यांची अनुक्रमे सचिव आणि उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे, तर साहलम शेख हे सहसचिव आणि जगदीश आर्चेकर हे खजिनदार असणार आहेत.

विजय पाटील यांनी क्रिकेट फर्स्ट गटाकडून अर्ज दाखल केला होता. आता पाटील यांना बाळ महाडदळकर या प्रतिस्पर्धी गटाकडून अध्यक्षपदासाठी पाठिंबा मिळाला आहे. एमसीएच्या याआधीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये पाटील यांचा पराभव झाला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाजी मारली होती. मात्र नंतर एमसीएने सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने नियुक्त केलेल्या

अशी आहे कार्यकारणी

अध्यक्ष : डॉ. विजय पाटील , बिनविरोध
उपाध्यक्ष : अमोल काळे, बिनविरोध
सचिव : संजय नाईक, बिनविरोध
संयुक्त सचिव : शाहजाद शेख, 196 मतं.
खजिनदार : जगदीश आचरेकर, 189 मत

कार्यकारी सदस्य मंडळ :

१. उन्मेश खानविलकर 241 मत
२. अजिंक्य नाईक, 201
३. गौरव पय्याडे 180
४. विहान सरनाईक 165
५. अभय हडप 160
६. कौशिक गोडबोले 157
७. अमित दाणी 144
८. नदीम मेमन 140
९. याझदेगर्दी खोदादाद 133