मुंबईचे प्ले-ऑफमधून बाहेर

0

मुंबई-अत्यंत रोमहर्षक ठरलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा अखेर ११ धावांनी पराभव झाला. या पराभवामुळे मुंबईचे प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याचे स्वप्न अखेर भंगले. बेन कटिंगने अखेरच्या तीन चेंडूपर्यंत सामना नेल्यामुळे कमालीची रंगत निर्माण झाली होती. परंतु, अखेर मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला.

१७५ धावांचे आव्हान 

बेन कटिंग्जने २० चेंडुत २ चौकार ३ षटकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या. दिल्लीच्या गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी केली. संदीप लामिछाने, हर्षल पटेल आणि अमित मिश्रा यांनी प्रत्येकी ३ विकेट टिपल्या. ऋषभ पंत, व्ही शंकर यांच्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने निर्धारित २० षटकात ४ बाद १७४ धावा केल्या असून मुंबई इंडियन्सला १७५ धावांचे आव्हान दिले होते. १७५ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सने सुरूवात चांगली केली. सुर्यकुमार यादवने आपला आक्रमक सुरुवात केली मात्र ४ चेंडुंचा सामना करत १२ धावांवर तो बाद झाला. लामिछानेने त्याला बाद केले.

ऋषभ पंत फॉर्मात 

ऋषभ पंतने आपला फॉर्म या सामन्यातही कायम ठेवला. त्याने या हंगामातील सातव्या डावात आपले पाचवे अर्धशकत ठोकले. आपल्या खेळीत चौकार षटकारांची आतषबाजी करणार पंतला बाद करण्यात कृणाल पांड्याला यश आले. पंतने ४४ चेंडुत ४ चौकार ४ षटकारांच्या साहाय्याने ६४ धावा कुटल्या. दुसरीकडे त्याला व्ही शंकरने योग्य साथ दिली. शंकर ४३ धावांवर नाबाद राहिला. यात त्याने ३ चौकार व २ षटकार ठोकले. मुंबईकडून कृणाल पांड्या, बुमराह, मार्कंडे यांनी एक-एक गडी टिपला तर एक फलंदाज धावबाद झाला.