मुंबई :आयपीएल सर्वाधिक चार जेतेपद नावावर असलेल्या मुंबई इंडियन्सने पुढील हंगामाची तयारी सुरु केली आहे. फिरकीपटू मयांक मार्कंडेला दिल्ली कॅपिटल्सला दिले असून वेस्ट इंडिजचा खेळाडू शेर्फाने रुथरफोर्डला घेतले आहे. ‘मयांकला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मयांक हा प्रतिभावान खेळाडू आहे आणि तो आमच्या संघाचा सदस्य होता, याचा अभिमान आहे. हा निर्णय घेणे अवघड होते, परंतु मयांकच्या भल्याचा विचार करूनच आम्ही हा निर्णय घेतला आहे. तो भविष्यात भारतीय क्रिकेट संघातील स्टार असेल. त्याचवेळी शेर्फानेला संघात दाखल करून घेण्याचा आनंदही आहे.’अशी प्रतिक्रिया मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानीने दिली आहे.