मुंबई इंडियन्स सुसाट: एका फटक्यात सहाव्या स्थानावर पहिल्या स्थानी

0

नवी दिल्ली: आयपीएलचे तेरावे मोसम सध्या दुबईत सुरु आहे. काल गुरुवारी १ ऑक्टोंबर रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा सामना झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने दमदार कामगिरी करत ४८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह मुंबईने सहाव्या स्थानावरू थेट पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. मुंबईने आतापर्यंत ४ सामन्यात दोन विजय आणि दोन पराभवासह ४ गुण मिळवले आहेत. मुंबईचा नेट रनरेट +१.०९४ इतका आहे.

गुरुवारी झालेल्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजीकरत १९१ धावा केल्या होत्या. बदल्यात पंजाबला २० षटकात ८ बाद १४३ धावा करता आल्या. मुंबईने ४८ धावांनी विजय मिळवला. या सामन्याआधी मुंबई गुणतक्त्यात सहाव्या स्थानावर होता. पण सामना झाल्यानंतर थेट ते पहिल्या स्थानावर पोहोचले. गुणतक्त्यात दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या, कोलकाता नाइट रायडर्स तिसऱ्या, राजस्थान चौथ्या , रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू पाचव्या, किंग्ज इलेव्हन पंजाब सहाव्या, सनरायजर्स हैदराबाद सातव्या तर तीन वेळा आयपीएल विजेतेपद मिळवणारा धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज हा संघ अखेरच्या म्हणजे आठव्या स्थानावर आहे.