मुंबई दिल्लीवर भारी !

0

दुबई: आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) च्या तेराव्या मोसमाचे विजेतेपद मुंबई इंडियन्स संघाने मिळविले आहे. अंतिम सामन्यात मुंबई संघाने दिल्ली कॅपिटल्स संघाचा पराभव केला. मुंबई इंडियन्स संघाचे हे पाचवे विजेतेपद आहे. 2013, 2015, 2017, 2019 आणि आता 2020 असे पाच वेळा मुंबई संघ विजेते ठरले आहे. अशी कामगिरी करणारा मुंबई संघ एकमेव आहे.

मुंबई संघाचे कर्णधार रोहित शर्मा तर दिल्लीचे कर्णधार श्रेयस अय्यर होते. यंदाचे आयपीएल दुबई (संयुक्त अरब अमिरात)येथे खेळवले गेले. अंतिम सामना दुबईच्या मैदानावर खेळावला गेला. अंतिम सामन्यात दिल्ली संघाने मुंबईसमोर 157 धवांचे लक्ष ठेवले होते.

पंजाब संघाचा कर्णधार लोकेश राहुलने 14 सामन्यात सर्वाधिक 670 धावा केल्या, तो ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला तर दिल्लीचा फलंदाज कागिसो रबाडा 17 सामन्यात सर्वाधिक 30 विकेट घेऊन पर्पल कॅपचा मानकरी ठरला.