नवी दिल्ली: यावर्षीच्या आयपीएल १२ च्या हंगामाचा विजेता कोण ठरणार हे आज निश्चित होईल. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघात आज अंतिम सामना होणार आहे. दोन्ही संघ बलाढ्य असल्याने कोण बाजी मारणार हे सांगणे अवघड आहे. हैद्राबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर शेवटचा सामना होणार आहे.
यंदाच्या मोसमात हे दोन संघ तीनवेळा आमने-सामने आले, ज्यात मुंबईनेच बाजी मारली आहे. मात्र फायनलमध्ये मागील आकडेवारी, भूतकाळातील जय-पराजया यांचे महत्त्व कमी होते. प्रत्यक्ष लढतीत सरस कामगिरी करणारा संघ जिंकतो. मुंबई इंडियन्सने याआधी चारवेळा फायनलमध्ये धडक मारली असून तीनवेळा त्यांनी जेतेपद जिंकले आहे. यातील २०१३ व २०१५चे जेतेपद तर रोहित आणि कंपनीने चेन्नईला नमवूनच आपल्या नावे केले आहे.