मुंबई :- मुंबई इंडियन्सने कोलकात्यावर १३ धावांनी मात करत विजय मिळविला. सूर्यकुमार यादव आणि एविन लुईसच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे मुंबईला कोलकात्याविरुद्ध १८१ धावांपर्यंत मजल मारता आली. सूर्यकुमार यादवने 39 चेंडूत सात चौकार आणि दोन षटकारांसह 59 धावांची खेळी केली. तर इव्हिन लुईसने 28 चेंडूत 2 षटकार आणि पाच चौकरासह 43 धावांची खेळी केली. या दोघांत पहिल्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी झाली होती. कोलकात्यावरील विजयासह मुंबईचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहचला आहे, मात्र प्ले-ऑफच्या सामन्यांमध्ये प्रवेश मिळवायचा असल्यास यापुढचे चारही सामने जिंकण मुंबईला गरजेचं आहे.
कोलकात्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने प्रथम फलंदाजी करीत 4 विकेटच्या नुकसानावर 20 ओव्हरमध्ये 181 धावा आव्हान ठेवलं होत. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता नाइट रायडर्सने 20 षटकांत सहा बाद 168 धावापर्यंत मजल मारु शकले. कोलकात्याकडून रॉबिन उथप्पाने तुफानी खेळी करत संघाची विजयाच्या दिशेने वाटचाल केली होती. पण कोलकाताच्या तळाच्या फलंदाजांनी गोलंदाजांसमोर शरणागती पत्करल्यामुळे मुंबईने 13 धावांनी विजय साकारला.