मुंबई हागणदारीमुक्त झाल्याचा नुसताच गवगवा

0

मुंबई| मुंबई शहर हागणदारीमुक्त झाल्याचे केंद्राच्या क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाने (क्युसीआय) जाहीर केले आहे, तसे प्रशस्तीपत्रकच शासनाने मुंबई महापालिकेला दिले आहे. मात्र हा नुसताच गवगवा सुरू असल्याचा प्रत्यय उपनगरीय रेल्वे रुळांवरील अवस्था पाहिल्यावर येत आहे.

मुंबई शहर हागणदारीमुक्त झाल्याची दवंडी महापालिका पिटत आहे. केंद्र सरकारच्या क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडियाने मुंबईला हागणदारीमुक्त असे स्वच्छता प्रमाणपत्र दिले आहे. मात्र यावर खुद्द मुंबईकर नागरिकांना विश्‍वास बसत नाही, कारण आजही मुंबई शहरात सर्रासपणे लोक उघड्यावर शौचालयाला बसत असल्याचे चित्र दिसत आहे. मानखुर्द, गोवंडी या भागात नागरिक राजरोसपणे उघड्यावर शौचालयाला बसतात. या ठिकाणाकडील रेल्वे रुळ तसेच वांद्रे रेल्वे स्थानकांकडील रेल्वे रुळांचा आजही शौचासाठी वापर होत आहे. हार्बर रेल्वेच्या मार्गालगत असलेल्या जागेचा उपयोग शौच करण्यासाठी केला जातो, हे आजही वास्तव आहे. त्यामुळे मुंबई फक्त प्रशस्तीपत्रकापुरतीच हागणदारीमुक्त झाली आहे, असे चित्र असल्याचे दिसत आहे.

Web Title- Mumbai is defecation free is just publicity stunt