मुंबई: पारबंदर सेतूचे काम पूर्ण; आता वाहनांसह साहित्याची वाहतूक शक्य

मुंबई – नवी मुंबई प्रवास अवघ्या २० ते २२ मिनिटांत व्हावा यासाठी हाती घेण्यात आलेल्या मुंबई पारबंदर प्रकल्पातील (शिवडी – न्हावाशेवा सागरी सेतू) २१.८१ किमी लांबीच्या सागरी सेतूचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता या सेतूवरून वाहने, मालवाहू वाहने, बांधकाम साहित्य नेणे शक्य होणार आहे. यानिमित्ताने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बुधवारी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या वेळी उपस्थितीत राहणार आहेत. ते सागरी सेतूवरून वाहनाने प्रवासही करणार आहेत.