मुंबई- पुणे एक्स्प्रेस -वे- जाम

0

मुंबई:- मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर सलगच्या सुट्ट्यांमुळे वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. यामुळे लोणावळा घाटात वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू असून मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. गर्दी पाहता खालापूर टोलनाक्यावर अधिकच्या सहा लेन सुरू करण्यात आल्या आहेत.

आजपासून सलग चार दिवस सुट्ट्या आल्याने पर्यटकांनी फिरायला जाण्याचा पर्याय निवडल्याने ही वाहतूक कोंडी झाली आहे. आज चौथा शनिवार, उद्या रविवार, सोमवारी बुद्ध पौर्णिमा व 1 मे महाराष्ट्र दिन अशा चार दिवस लागून सुट्ट्या आल्याने पर्यटकांचा मुंबई बाहेर जाण्याचा पर्याय निवडला आहे.