पुणे-लोणावळ्यात मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टेम्पोला भीषण आग लागली आहे. सकाळी ७ वाजता ही आग लागली होती. टेम्पो मुंबईहून पुण्याला जात असताना ही आग लागली. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच आगीवर नियंत्रण मिळण्यात यश आले आहे.
टेम्पो मुंबईहून पुण्याला जात असताना लोणावळ्याजवळ येताच त्यात अचानक आग लागली. टेम्पोला आग लागल्याने बांधकामासाठी वापरण्यात येणारे साहित्य, प्लास्टिक, लादी साफ करण्याचे केमिकल आणि इतर किंमती साहित्य जळून खाक झाले आहे. आगीमुळे काही वेळासाठी वाहतुकीवर परिणाम झाला होता. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळण्यात यश आले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.