मुंबईच्या शेअर मार्केटमध्ये ‘अमरावती’ रोख्यांच्या विक्री

0

मुंबई –आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मुंबईच्या शेअर मार्केटमध्ये ‘अमरावती’ रोख्यांच्या विक्रीचे उद्घाटन केले. मुंबई शेअर बाजारात ‘अमरावती’ रोख्यांची नोंदणी करण्यात आली आहे. आज सकाळी शेअर बाजार उघडल्यानंतर लगेच दहा वर्षाचे अमरावती रोखे निर्गमीत करण्यात आले.

यावेळी मुंबई शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार, आंध्रप्रदेशचे वित्तमंत्री यनामाला रामकृष्णन, डॉ. पी. नारायणा यांची उपस्थिती होती. आंध्रप्रदेश कॅपीटल रिजन डेव्हलपमेंट अॅथॉरीटी ( एपीसीआरडीए ) च्या माध्यमातून हे रोखे निर्गमीत करण्यात आले. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी यावेळी गुंतवणूकदारांना संबोधित केले. यानंतर चंद्राबाबू नायडू हे उद्योगपतींच्या भेटी घेणार आहेत.