मुंबई – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा असलेल्या राष्ट्रीय मुस्लीम मंचतर्फे (आरएमएम) सह्याद्री गेस्ट हाऊस येथे सोमवारी आयोजित करण्यात आलेली इफ्तार पार्टी रद्द करण्याची मागणी मुंबईस्थित दोन माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केली आहे. वकील आदिल खत्री व माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले. शासकीय विश्रामगृह फक्त कार्यालयीन कामासाठी असून सार्वजनिक किंवा धार्मिक समारंभ तिथे आयोजित केले जाऊ शकत नाहीत. केवळ मते गोळा करण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचेही या कार्यकर्त्यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे.
मते गोळा करण्यासाठी पार्टी
शासकीय विश्रामगृह फक्त कार्यालयीन कामासाठी असून सार्वजनिक किंवा धार्मिक समारंभ तिथे आयोजित केले जाऊ शकत नाहीत. केवळ मते गोळा करण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचेही या कार्यकर्त्यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे. सह्याद्री गेस्ट हाऊसच्या प्रोटोकॉल विभागासह सर्व शासकीय विभागांसाठी जुलै २०१५ मध्ये राज्य व्यवस्थापन विभागातर्फे देण्यात आलेल्या आदेशानुसार सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये सार्वजनिक सभा घेण्यास किंवा बैठकी, कार्यशाळा आयोजित करण्यास मनाई आहे, असे या पत्रात म्हटले आहे.
“या आदेशानुसार येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व राज्यमंत्री मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव किंवा तत्सम पदावरील व्यक्तींनाच सभा, कार्यशाळा व पत्रकार परिषद आयोजित करण्याचा अधिकार आहे,” असे या पत्रात प्रामुख्याने नमूद करण्यात आले आहे. सह्याद्रीमध्ये आरएमएमला इफ्तार पार्टी आयोजित करण्यास परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.