मुंबई-पुणे महामार्गावर अपघात तीन ठार

0

पुणे-मुंबई-पुणे महामार्गावर पनवेलजवळ टेम्पोने कारला दिलेल्या धडकेत ३ जण ठार तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना कामोठे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई पुणे महामार्गावर पनवेलजवळ पुणेकडून मुंबईकडे येताना मारुती ओम्नी कार (एमएच-०४/एएस ९३८९) बंद पडली होती. त्यावेळी कारला धक्का मारताना पाठीमागून आलेल्या आयशर टेम्पोने (एमएच ४५/एएफ ९५४५) जोरदार धडक दिली.

ओम्नीमध्ये ८ जण प्रवास करीत होते. या जोरदार धडकेने संतोष प्रजापती (वय ४०), जुमन(वय ५५), रशीद (२५) हे ३ जण जागीच ठार झाले. तर संजय राजभर, मुद्रिका प्रसाद, रामचंद्र यादव (वय ४५), दिनेश (वय ३५), अजोला यादव (वय ४०) हे ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडला. अपघात झाल्यानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. तर खांदेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.