धक्का लागल्याच्या वादातून चोपड्यात खून, पाच अटकेत
जळगाव | प्रतिनिधी
तालुक्यातल्या विरवाडे गावातील एका तरुणाचा त्याच्याच गावातील तरुणाला धक्का लागला. या वादातून मुलासह त्याच्या कुटुंबातील पाच जणांनी तरुणाच्या घरी जाऊन चाकूने भोसकून तरुणाची हत्या केल्याची घटना २ मार्च रोजी रात्री घडली. या प्रकरणी शुक्रवारी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन एका महिलेसह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. भोजू वासुदेव कोळी (वय ३२, रा. विरवाडे ता. चोपडा) असं मयताचं नाव आहे.
भोजू कोळी आणि गावातील दिपक कोळी यांचा एकमेकांना धक्का लागल्यावरुन वाद झाला होता. या वादातून २ मार्च रोजी रात्री ८:३० ते ९ वाजेच्या दरम्यान भोजू कोळी याच्याकडे सागर देविदास कोळी, दिपक सुभाष कोळी, कैलास गुलाब कोळी, मनोहर संतोष कोळी आणि शोभाबाई देविदास कोळी (सर्व रा. विरवाडे ता.चोपडा) हे गेले. त्यांनी भोजू कोळी आणि त्याचा भाऊ राजेंद्र कोळी यांच्यासोबत वाद घालायला सुरुवात केली.