मांगडेवाडीत अल्पवयीन मुलाचा खून
पुणे | कात्रजजवळील मांगडेवाडी परिसरात बुधवारी दुपारी युवकाचा शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. किरकोळ कारणावरून घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.तन्मय किशोर इंगळे (वय १७, रा. मांगडेवाडी ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. यासंदर्भात चौकशीसाठी तीनजणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.तन्मय आणि संशयित आरोपी असलेले तरुण परस्परांचे मित्र आहेत. ते बुधवारी दुपारी मांगडेवाडी परिसरात जमले होते. त्यांच्यात पूर्वीच्या भांडणावरून बाचाबाची झाली.