अमेठी: उत्तर प्रदेशच्या अमेठी येथील बारौली या गावाचे माजी सरपंच स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या भाजपाच्या एका कार्यकर्त्याची घरात घुसून गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. सुरेंद्र सिंह असे हत्या करण्यात आलेल्या भाजपा कार्यकर्त्याचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे. ७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी सुरु आहे. उत्तर प्रदेशचे डीजीपी ओ.पी.सिंह यांनी चौकशी सुरु केली आहे. स्मृती इराणी यांनी सुरेंद्र सिंह यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत आरोपींना शिक्षा देण्याचे आश्वासन दिले. >