आपण भारतीय वायुसेनेतून वीस वर्षाची सेवा पूर्ण करून निवृत्त झालात त्यानंतर आपण सामाजिक क्षेत्राकडे वळालात गरीब लोकांना महागडे उपचार परवडणारे नाहीत त्यामुळे अनेकदा त्यांच्या जीवित्तास धोका निर्माण होतो मृत्यू पावणारे लोक परिस्थिती पुढे हतबल असतात अशा ‘नाही रे’वर्गाच्या मदतीला कोणीतरी असायला हवं हा निर्धार करून आपण आरोग्य सेवेचा वसा घेतला पुढे विमानांच्या गतीने झेप घेतलीत त्यामुळे हजारो रुग्णांना आधार मिळाला त्यांच्या शस्त्रक्रिया आपल्यामुळे विनामूल्य यशस्वी झाल्या.
अंधाराच्या कोपऱ्यापर्यंत उजेडाचे कवडसे नेताना पिचलेल्या उघडलेल्या माणसांना आपण मायेने जवळ केलं त्यांना प्रेमाने व आपुलकीने वागवलं आरोग्य सेवेची प्रेमाचं नातं जोडलं!
परिणामी विविध क्षेत्रातील मान्यवरांना आपल्या कामाचं कौतुक वाटलं त्यामुळे आपल्या पाठीवर शाबासकीची थाप टाकणारे तब्बल 86 पुरस्कार आपणास सन्मानपूर्वक मिळाले आहेत.
म्हणून आपल्या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन सत्य शिव ग्लोबल फाउंडेशन अहिल्या आरोग्य हेल्पलाइन व फर्स्ट एड डॉक्टर असोसिएशनच्या वर्धापन दिनानिमित्त “हेल्थ आयकॉन सुश्रुत 87 वा पुरस्कार” आपणास प्रदान करताना आम्हास मनस्वी आनंद होत आहे.
डॉ. रोहित बोरकर,
अध्यक्ष सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन
सौ अर्चना पाटील
कार्याध्यक्ष अहिल्या आरोग्य हेल्पलाइन
डॉ. सदा रासगे
अध्यक्ष फर्स्ट एड डॉक्टर असोसिएशन.