वर्षभरापूर्वी पत्रकारिता पासून थोड बाजूला होत, रासायनीक खतांचा कमीत कमी वापर करून शुद्ध सेंद्रीय शेती करण्याचा निर्णय घेतला.या प्रमाणे काम सुरू केले. जिवामृतचा प्लांट तयार केला.अमाप कष्ट, भरपुर खर्च झाला आहे.काही झाडांना लागलेली फळ पाहून आशेचा किरण दिसू लागला आहे. आपला कृषी विभाग विशेषतः अधिकारी वर्ग अत्यंत ढेपाळलेल्या अवस्थेत असून त्यामुळेच आपल्याकडे शेतकरी आत्महत्येच प्रमाण अधिक आहे. खर तर जे शेतकरी नव्या उमेदीने शाश्वत शेती करू पहात आहे.त्यांना खंबीर साथ देण्यासाठी हे अधिकारी खुर्चीची ऊब सोडून बांधवर फिरत नाही,तो पर्यंत आपल्या शेतकऱ्यांची परिस्थिती बदलेल असे वाटत नाही*
*विषमुक्त सेंद्रीय शेती करणे काळाची गरज आहे.मात्र, शेती पिकांच्या अनुदानासाठी तयार केलेले नियम अत्यंत कुचकामी आणि निव्वळ बावळटपणा सारखे आहे. सेंद्रीय शेतीसाठी सुरुवातीला लाखो रुपयांचे भांडवल गुंतावे लागते. या वाटचालीत अमाप कष्ट आणि भांडवल या दोन्ही गोष्टी आल्याचं.या सर्व खाचखलग्यांचा विचार करून गेल्या वर्षभरापासून मी येवले तालुक्यात गवंडगाव शिवारातील माझ्या पावणेसात एकर वर संघर्ष करीत आहे.त्याला आता यश येऊ पहात आहे.यासाठी जीवामृत निर्माण करनारा ६हजार लिटर शमतेचा एन एअरबेटिक फुगा बसविला आहे.कमीत कमी मजूरा बरोबर स्वतः शेतीत राबून मोठया कष्टाने सेंद्रिय शेतीचा आदर्श उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे.या प्रयोगाच्या पहिल्या टप्प्यात पावणेसात एकर पैकी 4 एकर बांबू यापैकी बांबूच्या शेतीत 36 गुंठ्यांत सदाबहार पेरू लागवड केली आहे. भारतातील आणि महाराष्ट्रातील हा खूप सुंदर अप्रतिम प्रयोग आहे. मियावाकी फ्रुट फॉरेस्ट टेक्नॉलॉजी आणि अल्ट्रा हायडेन्सिटी या पद्धतीने लागवड केलेली आहे. 36 गुंठ्यामध्ये 2000 सदाबहार पेरूच्या रोपांची तसेच सफेत जांभूळ, आवाकोडा, ड्रॅगन, अंजीर, सिडलेस लिंबू,काजू शुद्ध गावरान भाजीपाला लागवड करून कमी क्षेत्रात जास्त झाडांचे रोपण करून जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यावरती माझा भर आहे.
हे प्रयोग करतांना मोठ्या भांडवलाची गरज आहे. मात्र अनुदानासाठी शासनाचे नियम अत्यंत किचकट आणि एसी रूममध्ये बसून बनविल्यामुळे अनुदानाकडे दुर्लक्ष करून खर्चिक परंतु शाश्वत उत्पन्न देणारा हा प्रयोग अत्यंत धाडसाने केला आहे.या प्रयोगासाठी शासनाची साथ मिळणे आवश्यक आहे,हेच गणित चुकत असल्यामुळे शेतकरी बांधवांन कडे कोणी लक्ष देईल का